गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • प्रीती म्हणजे काय
  • Preeti MHanje Kay
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    प्रीती प्रीती सारे म्हणती, प्रीती म्हणजे काय ?

    दिवस विलक्षण सुंदर तो क्षण
    चाफ्याखाली तुला पाहिली
    केस रेशमी, नयन बदामी
    हसलीस का तू ? हसलो का मी ?
    मनात आले काहीबाही आणि थबकले पाय

    पायी हिरवळ गगनी तारा
    युवक

    समोरी हसरा गोरा
    शीळ पुकारित गेला वारा
    गोड शिर्शिरी उभ्या शरीरी
    तनामनातुन लहर एक ती वीज चेतवित जाय

    नकळत नकळत जवळी सरलो
    तरुवेलीसम का मोहरलो
    लाजलाजे उगा राहिलो
    हात मी तुझा हाती प्रिये घेतला
    हृदयी का या घेऊन दिधला
    कलकल कलकल करी अचानक पक्ष्यांचा समुदाय


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems