गदिमा नवनित
  • उचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोले
  • Phandyavari Bandhile Ga Mulini Hindole
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोले
    पंचमिचा सण आला डोळे माझे ओले

    श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी
    माझे पण प्राणनाथ घरी नाही आले

    जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
    खळाखळा वाहतात धुंद नदीनाले

    पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात
    भिजलेल्या चिमणीचे पंख

    धन्य झाले

    आरशात माझी मला, पाहू बाई किती वेळा
    वळचणीची पाल काही भलेबुरे बोले


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems