गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • बाळ तुझे नवसाचे
  • Bal Tuze Navasache
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बाळ तुझे नवसाचे - यशोदे, बाळ तुझे नवसाचे
    निळे सावळे रूप तयाचे, फूल जसे जवसाचे

    लळा लागला मनोहराचा, विसर पडे मज संसाराचा
    याच्यासंगे पळती पळासम प्रहर उभ्या दिवसाचे

    दिवस संपला, दीप लागले, घरा परतले गोप भागले
    जिवावरी पण येते माझ्या गेही

    परतायाचे

    यास संगती कशी मी नेऊ, घरात सासू, नणंद, जाऊ
    सासुरवासी जिणे जाणिसी माझे वनवासाचे


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems