गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • बुगडि माझी सांडलि ग
  • Bugadi Mazi Sandali Ga
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बुगडि माझी सांडलि ग
    जाता सातार्‍याला ग जाता सातार्‍याला
    चुगलि नगा सांगू ग
    माझ्या म्हातार्‍याला ग माझ्या म्हातार्‍याला !

    माझ्या शेजारी तरूण राहतो
    टकमक टकमक मला तो पाहतो
    कधि खुणेने जवळ बाहतो
    कधि नाही ते भुलले ग बाई,
    त्याच्या इशार्‍याला,

    त्याच्या इशार्‍याला !

    आज अचानक घरी तो आला
    पैरण, फेटा नि पाठीस शेमला
    फार गोड तो मजसी गमला
    दिला बसाया पाट मी बाई,
    त्याला शेजार्‍याला, माझ्या शेजार्‍याला !

    घरात नव्हते तेव्हा बाबा
    माझा मजवर कुठला ताबा
    त्याची धिटाई तोबा तोबा !
    वितळु लागे ग लोणी बाई,
    बघता निखार्‍याला, बघता निखार्‍याला !

    त्याने आणिली अपुली गाडी
    तयार जुंपून खिलार जोडी
    मीहि ल्याले ग पिवळी साडी
    वेड्यावाणी जोडीने ग गेलो,
    आम्ही बाजाराला, आम्ही बाजाराला !

    येण्याआधी बाबा परतून
    पोचणार मी घरात जाउन
    मग पुसतील काना पाहून
    काय तेव्हा सांगू मी ग बाई,
    त्याला बिचार्‍याला, त्याला बिचार्‍याला !


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems