गदिमा नवनित
  • एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे
    जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • बोल ग मैने बोल
  • Bol Ga Maine Bol
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बोल ग मैने, बोल
    फांदीफांदी आज लहडली, वासंतिक हिंदोल !

    तुझा लाडका राजस रावा
    तुज सौख्याच्या आणी गावा
    हिरव्या पानी नवखे घरकुल हलके घेई डोल

    नयन तेच पण नवीन दृष्टी
    पंख तेच पण नवीन सृष्टी
    तोच गळा पण आज

    नव्याने साद आपुला खोल !

    छेड स्वरांचा मंजूळ पावा
    भार सुखाने नवखा रावा
    आज प्रीतीसंगे साजणी दुनिया अवघी तोल !


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems