गदिमा नवनित
  • कधिं न चळावे चंचल हें मन
    श्रीरामा, या चरणांपासुन
    जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • मथुरेत मी गोकुळी कान्हा
  • Mathuret Me Gokuli Kanha
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    आवरिले मी नयनीं आसूं
    कसा आवरू उरिंचा पान्हा
    मथुरेत मी, गोकुळी कान्हा !

    कुठे तान्हुले, कुठे माउली
    कुठे वासरू, कुठे गाउली
    त्यात शृंखला अशा पाउली
    कशी जाउ मी, पाहू तान्हा ?

    बसल्या ठायी बसुन पाहते
    चंद्रबिंब हळुहळू वाढते


    असेल झाले बाळ रांगते
    म्हणेल आई तेथे कोणा ?

    स्वर्गाहुनिया ज्याची थोरी
    ते सांगाया जगात चोरी
    जाणशील का बाळा, तू तरि ?
    तुझ्याचसाठी याहि यातना


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems