गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • मधु इथे अन्‌ चंद्र तिथे
  • Madhu Ethe Aan Chandra Tithe
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    , झुरतो अंधारात
    झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात

    एक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
    हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात
    सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात

    माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
    ताटातुटीने सुरेख झाली

    संसारा सुरवात
    संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात

    किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्‍तीत
    अशी निघाली लग्नानंतर वार्‍यावरची वरात
    वार्‍यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems