गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
मधुराणी तुला सांगू का
Madhurani Tula Sangu Ka
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
मधुराणी तुला सांगू का ?
तुला पाहून चाफा पडेल फिका
मधुराजा तुला सांगू का ?
मला म्हणुनीच लाभे सुरेख सखा
तुझ्या रंगात काही निराळी छटा
तुझ्या बेबंद भाळी खिलाडू बटा
तुझे मखमाली हात
तुझे अवखळ दात
नको फिरवूस
राणी मुखा
हा आनंद नाही कधी लाभला
तनू अर्पित होते मनाने तुला
मला कळले न गूज
नसे पुरुषांना बूज
घेई पदरात सार्या चुका
चंद्रमौळी हा संसार झाला सुरू
उभे मंदिर येथे उद्याला करू
तुझे मर्दानी हात
तुझ्या प्रीतिची साथ
दारी मोहोर यावा सूखा