गदिमा नवनित
 • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
  सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • माझा होशिल का
 • Maza Hoshil Ka?
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  सांग तू, माझा होशिल का ?

  वसंतकाली, वनी दिनान्ती
  एकच पुशिते तुज एकांती
  एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का ?

  नसेल माहित तुला कधी ते
  रोज तुझ्या मी स्वप्‍नी येते
  त्या स्वप्‍नांच्या आठवणी या ओठां देशिल का ?  दूर तू तरी जवळ तुझ्या मी
  नाव गुंतवीत तुझिया नामी
  मी येता पण सलज्ज जवळी, जवळी घेशिल का ?