गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • मी तर प्रेम दिवाणी
 • Me Tar Prem Diwani
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  मी तर प्रेम दिवाणी
  माझे दुःख न जाणे कोणी !

  आर्ताची गत आर्ता ठावी
  कळ ज्या अंतःकरणी
  स्थिती सतीची, सतीच जाणे
  जिती चढे जी सरणी !

  शूळावरती शेज आमुची
  कुठले मीलन सजणी ?
  गगनमंडळी नाथ झोपती
  अमुच्या

  दैवी धरणी !

  दुखणाइत मी फिरते वणवण
  वैद्य मिळेना कोणी
  या मीरेचा धन्वंतरी हरि
  श्यामल पंकजपाणि !