गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
माझ्या रे प्रीती फुला
Mazya Re Preeti Phula
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
माझ्या रे प्रीती फुला, ठेवू मी कोठे तुला
मिरवू माथी का तुला मी दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे उघड सार्या निंदका
काळजाचा कंद तू रे रंग डोळ्यांतला
अधीर हळवे दोन डोळे, पुष्पपात्रे ही निळी
ठेविसी तेथे फुला तू, फुलत
जाते पाकळी
भोवताली गंध दाटे धुंद चैत्रातला
तूच नयनी तूच हृदयी तूच वसशी जीवनी
काळ जाई कळत नाही दिवस किंवा यामिनी
आणला गे काय संगे गंध स्वर्गातला
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.