गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • माय यशोदा हलवी पाळणा
 • May Yashoda Halavi Palana
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
  बालमुकुंदा मेघ:श्यामा करि गाई गाई

  भरुनि येता हात जरा ती झोका थांबवुनी
  उठे पाळण्यापाशी येई पाही डोकावुनी
  हात पाय नाचवी श्रीहरि हासुनी वर पाही
  माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई

  दिसमासाने कृष्ण

  वाढला लागे रांगाया
  धरावयासी धावे माता वार्‍यासी वाया
  पुरे पडे ना वाडा अंगण अपुरे त्या होई
  माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई