गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • कोण मी अन्‌ कोण ते
 • Kon Me Aan Kon Te
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  मिटुन डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते
  कोण मी अन्‌ कोण ते !

  गाइल्यावाचून त्यांनी गीत त्यांचे ऐकते
  भेटल्यावाचून त्यांना गूज माझे सांगते !

  नाव नाही पुशियले मी, मीच काही योजिते
  तेच ओठी घोळताना मी स्वत:शी लाजते !  भावनांचा भास का हा ? कल्पनांची कूजिते ?
  वचन नाही घेतले मी वाट तरिही पाहते !

  बोलले काहीच ना ते, मी न काही जाणते
  जोडते जिवांस दोन्ही मुग्ध नाते कोणते ?


गदिमा गौरव | Special Quotes
 • लेखक पु.भा.भावे:
  वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems