गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
धीरे जरा गाडीवाना
Dhire Jara Gadivana
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
धीरे जरा गाडीवाना रात निळी काजळी
मुलुख त्यात मावळी, मुलुख त्यात मावळी !
वाट चुके लवणाची वळणाचा पेच पडे
डोंगराच्या डगरींना घाटाचा माठ जडे
दोहीं बाजू दाट कुठे आंबराई जांभळी
मुलुख त्यात मावळी !
घुंगुराच्या तालावर सैल सुटे कासरा
खडकाशी चाक थटे बैल बुजे बावरा
पेंगुळता हादरती गाडीमंदी मंडळी
मुलुख त्यात मावळी !
करवंदी जाळिमंदी ओरडती रातकिडे
निवडंगी नागफणी आडविता चाल अडे
ठोकरली येथ गड्या बादशाही आंधळी
मुलुख त्यात मावळी !
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.