गदिमा नवनित
  • आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
    म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ,आ,ई
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • मैना राणी चतुर-शहाणी
  • Maina Rani Chatur Shahani
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    मैना राणी, चतुर-शहाणी, सांगे गोड कहाणी
    कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी

    सिंह वनाचा असतो राजा, भीती त्याची चित्ती
    वाघ वागतो भिउन त्याला गुडघे टेकी हत्ती
    अति चतूर पण कोल्हा कोणी सिंहा पाजी पाणी

    कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा
    घरी

    बोलावुन पाण‍उतारा करी पाहुण्याचा
    कडीवरी त्या कडी करुनिया टोला कोल्हा हाणी

    शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची
    त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची
    एक कोंबडा उघडकीस पण ढोंगच त्याचे आणी


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems