गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • यश तेची विष झाले
 • Yash Techi Vish Zale
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  यश तेची विष झाले, देहांत ते उफाळे
  स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे ?

  सुमहार वाटला जो, तो एक साप काळा
  प्रासाद थाटला जो, ती बंद बंदिशाळा
  वा बंधनात बांधी माझे मलाच जाळे

  हा खेळ संपलासे आता न हारजीत
  या

  हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत
  माझ्याच काजळाने हे तोंड होय काळे !


गदिमा गौरव | Special Quotes
 • प्रा.रा.ग.जाधव
  माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems