गदिमा नवनित
  • या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
    पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • याल कधी हो घरी
  • Yal Kadhi Ho Ghari
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    याल कधी हो घरी
    घरधनी, याल कधी हो धनी ?
    उगाच आले मन अंधारून
    भीती दाटली उरी

    असाल कोठे कुठल्या ठायी
    कुठे चालली घोर लढाई ?
    रक्‍त गोठते म्हणती तेथे बर्फाच्या डोंगरी

    हे दुबळेपण मज न शोभते
    सुदैवेच

    हे दु:ख लाभते
    सात पिढ्यांनी अशीच केली देशाची चाकरी

    वीरपत्नी मी वीरकन्यका
    गिळून टाकिन व्यथा, हुंदका
    नका तुम्हीही घरा आठवू, शर्थ करा संगरी


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems