गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
रचिल्या कुणि या प्रेमकथा
Rachilya Kuni Ya Premkatha
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?
नभि दिवसाचा देव उगवला
धरणीवरी का नवा तजेला
दंव डोळ्यांतिल पार पळाले, त्यानी तिज पाहता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?
ही चाफ्याची कळी गोरटी
अति लाजवट खुळी पोर ती
कशि उमलली, गीत लाडके वार्याचे
ऐकता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?
नवपर्णांनी पूर्ण लहडला
वृक्षराज हा गगना भिडला
कशी तयाला दे आलिंगन कोमल पुष्पलता
रचिल्या कुणि या प्रेमकथा ?
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.