गदिमा नवनित
  • प्रभो, मज एकच वर द्यावा
    या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • रामचंद्र स्वामी माझा
  • Ramchandra Swami Maza
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा
    राम सज्जनांचा त्राता, हाती धनु पृष्ठी भाता
    राम दुर्जनांचा वैरी, राम त्राटिकेसी मारी

    रामे धनुष्य मोडिले, नाते सीतेशी जोडिले
    राम जानकीचा नाथ, पराक्रमी पुण्यव्रत

    राम वनवासी झाला, पितृवचनी गुंतला
    रामे भुलावण केली, शूर्पणखा विटंबिली


    राम शूर शिरोमणी, एकपत्नी एकबाणी

    रामा राक्षसे भोवली, सीता दशानने नेली
    राम लोचने पेटली, रामे निर्दाळिला वाली
    राम किष्किंधेसी आला, तथा सुग्रीवाचा झाला

    रामे सैन्ये मेळविली, चाल लंकेवरी केली
    राम आला, राम आला, रामे सागर जिंकीला
    रामा आडिवतो कोण, जळी पडले पाषाण
    मरू घातला रावण, मार्ग चाले 'रामायण'


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems