गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
रंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या
Rangubai Gangubai Haat Jara Chalu Dya
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
का ग अशा थांबला आपसांत पांगला
दिवस आज चांगला, भांगला ग भांगला
रंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या
बिलवरांसी बांगड्यांना किण्णकिण्ण बोलू द्या
घरात सवत नाही ना खपत तसंच गवत रानामंदी
धरून मुठीत, मुळात छाटीत, फेकत ऐटीत उन्हामंदी
रानातला रोग
सारा बारा वाटा जाऊ द्या
शंभर खुरपी सरळ तिरपी चालवा सारखी जोसामंदी
वेग तो वाढवा आवाज चढवा भरा ग गोडवा उसामंदी
काजळाच्या खाणीवाणी वाफा-वाफा होऊ द्या
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.