Lala Jivala Shabdach Khote
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही
पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे
दाणा, दाणा आणून जगवी, जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले पिल्लू उडूनी जाई
रक्तहि जेथे सूड साधते तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही