गदिमा नवनित
  • एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,
    शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
  • Lakdachya Vakharit Makdacha Davakhana
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    लाकडाच्या वखारीत, माकडाचा दवाखाना
    खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथे येती रोगी नाना
    माकडाचा थाट, डोक्यावर हॅट
    पायात विजार, तोंडात सिगार,
    एक आली काळी बाई, तिचं नाव कोकिळाताई
    तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येती कळा
    माकड म्हणाले, ‘धीर धरा, जरा थोडा ‘आ’ करा’’
    कोकिळेने

    केले ‘आ!’ माकड म्हणाले, ‘वा!’
    एक काजवा चिमटीत घेऊन, माकडाने चोच घेतली पाहून
    ‘काय’? म्हणाली कोकिळा
    माकड म्हणाले, ‘गंडमाळा-टॉनसील्स-टॉनसील्स’’
    ‘‘चार महिने गाऊ नका उन्हातान्हात जाऊ नका
    थोडा तरी विसावा घ्या, बरा कैर्या आणून द्या.’’
    भंबेरी भंबेरी भम्!
    मग आले भीत भीत, पिपळावरचे दिवाभीत
    माकड म्हणाले, ‘‘होतंय काय ?’’
    पोटी भूक जागत नाही, रात्री झोप लागत नाही.
    माकड म्हणाले, ‘‘डोळे उघडा, जीभ थोडकी बाहेर काढा.’’
    घुबड म्हणाले, ‘‘काय कारण?’’ माकड म्हणाले, ‘‘जाग्रण, जाग्रण.’’
    ‘‘दिवसा उगीच निजू नका, पावसा-पाण्यात भिजू नका,
    अंधारातून हिडू नका, फार विचार करू नका,
    उगीचच्या उगीच मरू नका, अंड्याचे कवच घेऊन या
    आपले औषध घेऊन जा.’’
    भंबेरी, भंबेरी, भम्!
    बोक्याला झाला खोकला, तो चुलीपुढे ओकला,
    मनुताई भ्याल्या, दवाखान्यात आल्या.
    माकड म्हणाले, ‘‘या ताई, बसा अशा शेजारी
    बोकोबा की पिल्लू टिल्लू, कोण आहे आजारी?’’
    मनू म्हणाली, ‘‘वैद्यबुवा, यांच्यासाठी हवा दवा.’’
    माकडाचा
    दवाखाना
    ‘‘काय झालं बोकोबाला ?’’ मनु म्हणाली,‘‘खोकला.’’
    माकड म्हणाले ताईंना, ‘‘सांगा तुमच्या यजमानांना
    दूध, दही पिऊ नका. उंदीरबिदीर खाऊ नका
    अडगळीबिडगळीत जाऊ नका
    गोळ्या देतो बडगा छाप, तासातासांनी दोन घ्या.’’
    भंबेरी, भंबेरी, भम्!
    मग आला वखारवाला, त्या रोग्याला डॉक्टरच भ्याला
    रोग्याने घेतली काठी, हाणली एक पाठी
    रोगी मारता राहीना; माकडाला उठता येईना
    शेपटी बसली अडकून, मार खाल्ला सडकून,
    माकड झाले गप्प, तोंड सुजून भप्प,
    आता औषध कुठलं, वैद्यालाच पिटलं
    भंबेरी, भंबेरी, भंबेरी, भम्!


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems