गदिमा नवनित
  • उद्धवा अजब तुझे सरकार!
    लहरी राजा प्रजा आंधळी,अधांतरी दरबार!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • लाज वाटे आज बाई
  • Laaj Vate Aaj Bai
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    लाज वाटे आज बाई, वाटतो आल्हादही
    व्हवयाची भेट त्यांची व्हायचा संवादही

    जवळ येते ती घडी अन्‌ दूर जातो धीर का ?
    भरुनि येती उगीच डोळे, कंप देही सारखा
    भास होतो पावलांचा, कानि येते सादही

    दोन भुवया या कमानी, पापण्यांची तोरणे


    प्रियकराच्या स्वागतासी सिद्ध झाली लोचने
    जीव थांबे लोचनी त्या, ना तनूची दादही


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems