गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
लावियले नंदादीपा तुवा मंदिरात
Laviyale Nandadeep Tuva Mandirat
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
लावियले नंदादीपा तुवा मंदिरात
भक्तिभाव धरुनी केली आणि तेलवात
तिमिरगूढ गाभार्यात पाजळता दीपज्योत
हसे तिथे मांगल्याचे तेज मूर्तिमंत
जीर्ण परि देव्हार्यात तुझी तुला दिसता मूर्त
मालविला दीपक का तू, कोपलीस व्यर्थ