गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
लंगडा ग बाई, लंगडा
Langada Ga Bai Langada
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
लंगडा ग बाई, लंगडा
नंदाचा कान्हा लंगडा !
रंगाने काळा, वाणीने बोबडा
त्या काळ्याचा लळा राधिके, काय तुला एवढा ?
नंदाचा कान्हा लंगडा !
बाळकृष्ण हा दिसे लंगडा परि मला ज्ञात
तिन्ही जगाला घाली वळसा तीन पावलांत
वेद जगाची
वचने गाली- तो कैसा बोबडा ?
नंदाचा कान्हा लंगडा !
काळा म्हणता घननीळाला का हो गोपीजन ?
सूर्यचंद्रही वेचित फिरती त्याचे तेज:कण !
चैतन्याची अतर्क्य माया काय कळावी जडां ?
नंदाचा कान्हा लंगडा !
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.