गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
उत्सव चाले रंगाचा
Utsav Chale Rangacha
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
वळते वाट चढता घाट
तोल सावरा अंगाचा
वसंत आला वनात बाई, उत्सव चाले रंगाचा !
बाई जपून जा, गडे जपून जा ग
जपून जा बाई जपून जा !
हा चैत्र प्रीतिचा महिना
तरुतरूंत गाती मैना
खगाखगांचा सूर लागतो आज
वेगळ्या ढंगांचा !
वनलतांत घुमती वाळे
त्या तिथेच मन्मथ खेळे
तळ्यात फुलल्या कमळांभवती संघ गुणगुणे भृगांचा !
भिरभिरून वारा येतो
अन् पदरा उडवुन देतो
वातावरणी थवा तरंगे सप्तरंगि त्या मेघांचा !
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..