गदिमा नवनित
  • दैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा
    वनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • बाई मी विकत घेतला श्याम
  • Bai Me Vikat Ghetla Sham
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    नाहि खर्चिली कवडीदमडी, नाहि वेचला दाम
    विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम !

    कुणी म्हणे ही असेल चोरी
    कुणा वाटते असे उधारी
    जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम !

    बाळ गुराखी यमुनेवरचा
    गुलाम काळा संतांघरचा
    हाच तुक्याचा विठ्ठल आणि

    दासाचा श्रीराम !

    जितुके मालक, तितुकी नावे
    हृदये तितुकी, याची गावे
    कुणि न ओळखी तरिही याला दीन अनाथ अनाम !


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems