गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
विझले रत्नदीप नगरात
Vizale Ratnadeep Nagarat
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
विझले रत्नदीप नगरात
आता जागे व्हा यदुनाथ !
अंधारातुन प्रकाश निवळे
हलकेहलके पूर्वा उजळे
दंवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात !
जागी झाली सुर्वणनगरी
अरुणासह ये उषासुंदरी
सोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात !
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.