ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
शपथ या बोटांची, शपथ या ओठांची
तुझी मी जोडीदार
शपथ वनाची रे, शपथ मनाची रे
आकाशाची, दिशांगनाची
शपथ धरतीची, शपथ नवतीची
तुझी मी जोडीदार
शपथ खगांची रे, शपथ नगांची रे
प्रीत भारल्या उभ्या जगाची
शपथ या वार्यांची, नभातील
तार्यांची
तुझी मी जोडीदार
शपथ जळाची रे, शपथ कुळाची रे
तरु-लतिकांची, फुलाफुलांची
शपथ या श्वासांची, सुगंधीत वासांची
तुझी मी जोडीदार
शपथ आजची रे, शपथ उद्याची रे
सागरवेड्या सर्व नद्यांची
शपथ रे प्रीतीची, शपथ रे नीतिची
तुझी मी जोडीदार