ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
सजणाच्या मर्जीखातर, जरासा वर, धरिला अंबाडा
उघडीच ठेवली मान, केतकी पान, सोनकेवडा !
घातला वेश पंजाबी, तंग सलवार
रेशमी खमीज अंगात सैल दळदार
झिरझिरित दुपट्टा वरी, टिकेना उरी, पडे तोकडा
पावडरचा मुखावर थर एक पातळ
किरमिजी रंगले ओठ, नयनी काजळ
मुळचेच गाल मखमली, चाखतो लाली, तीळ चोंबडा