गदिमा नवनित
  • हस्ति सर्व संपदा,मस्तकात शारदा
    असे असून दिनसा,झुरसी काय व्यर्थ तू,माणसा समर्थ तू!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • सासुर्‍यास चालली लाडकी शकुंतला
  • Sasuryas Chalali Ladaki Shakuntala
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    सासुर्‍यास चालली लाडकी शकुंतला
    चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला !

    ढाळतात आसवे मोर-हरीणशावके
    मूक आज जाहले सर्व पक्षि बोलके
    यापुढे सखी नुरे, माधवी-लते, तुला !

    पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
    गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
    दंति

    धरुनि पल्लवा आडवी खुळी तिला !

    भावमुक्‍त मी मुनी, मला न शोक आवरे
    जन्मदांस सोसणे दुःख हे कसे बरे ?
    कन्यका न, कनककोष मी धन्यास अर्पिला !


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems