गदिमा नवनित
  • उचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • सुखद या सौख्याहुनि वनवास
  • Sukhad Ya Saukhyahuni Vanvas
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    सुखद या सौख्याहुनि वनवास
    राजगृही या सौख्य कशाचे, सौख्याचा आभास

    गोदातटीची पंचवटी ती, आठवते मज पर्णकुटी ती
    प्रिय रघुनंदन, प्रिया जानकी, एकामेकां जवळ सारखी
    कपोत युगुलापरी लाभला रात्रंदिन सहवास

    येथ घेरिती तया प्रजाजन
    दुरावती मज जानकी-जीवन
    भरजरी वसने, रत्‍नकंकणे,

    असह्य मज ही राजभूषणे
    रावणसे हे राज्ञीपद का कारण हो विरहास


गदिमा गौरव | Special Quotes
  • पं.महादेवशास्त्री जोशी
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems