गदिमा नवनित
  • दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण
    कसा,कुठे टाका घालू,आणू कोठली नविन?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • सुरावटीवर तुझ्या उमटती
  • Suravativar Tuzya Umatati
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
    कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले
    मला समजले, तुला समजले

    काल रात्री मी जाग जागलो अवघे जग जरी होते निजले
    जागरणाचे कारण राजा तुला समजले, मला समजले

    तीन दिवस ना भेट

    आपुली कितीदा माझे डोळे भिजले
    आंसू मागील भाव अनामिक तुला समजले, मला समजले

    तुझ्या नि माझ्या मनात राणी गूज खोलवर एकच रुजले
    कुजबूज काही केल्याविण ते तुला समजले, मला समजले

    मनोरथांचा उंच मनोरा, मजल्यावरती चढले मजले
    मधुचंद्रास्तव लाभे वास्तू तुला समजले, मला समजले

    मला आणखी तुला आपुले दोघांचेही भाव उमजले


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems