गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • संथ वाहते कृष्णामाई
  • Santha Vahate Krushnamai
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    संथ वाहते कृष्णामाई
    तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही

    नदी नव्हे ही निसर्ग-नीती, आत्मगतीने सदा वाहती
    लाभहानिची लवही कल्पना नाही तिज ठायी

    कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता
    पाषाणाची घडवुन मूर्ती पूजित कुणी राही

    सतत वाहते उदंड

    पाणी, कुणी न वळवुन नेई रानी
    आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी ?


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems