गदिमा नवनित
  • या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
    पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • सौंदर्याची खाण पाहिली
  • Saundaryachi Khan Pahili
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    सौंदर्याची खाण पाहिली, पाहिली आम्ही पहिल्यांदा
    नयनांमधला बाण लागला, लागला आम्हां पहिल्यांदा

    वाटते परंतु सांगाया ना जुळे
    डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे
    बोलल्या वाचुनी गूज तुम्हाला कळे
    शब्द मधाचे ठिबकू द्यात ना, ठिबकू द्या कानी पहिल्यांदा

    हा रंग गोड का

    गालावरची खळी
    पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी
    उपजली उगीचच मनात आशा खुळी
    घायाळाची गती समजली, समजली आम्हां पहिल्यांदा

    या आधी आम्हां माहीत नव्हती प्रीती
    परि आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
    कधी दोन मनांची जुळून येतील नाती
    नकळत चेटुक होय आम्हांवर, आम्हांवर असले पहिल्यांदा


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems