गदिमा नवनित
 • पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • स्‍नान करिती लोचने
 • Sanan Kariti Lochane
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  स्‍नान करिती लोचने, अश्रुंनी पुन्हापुन्हा
  शेषशयन श्रीधरा दृष्टी अधिर दर्शना

  नील या नभाकडे मी भुलून पाहते
  मीन होऊनी तनू निळ्या जळात पोहते
  नील कमल पाहता तूच भाससी मना

  तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
  तुझेच तेज घेऊनी सूर्य विश्व उजळितो


  तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना

  लोचनांस लागले वेड रे निळेनिळे
  दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सांवळे
  जन्मपूष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना