गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
हरवले माझे काही तरी
Haravle Maze Kahi Tari
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
हरवले माझे काही तरी !
काय हरवले, कसे हरवले, काहि कळे ना परि !
सहज कुणाला दुरुन पाहिले
ओठंगुन मी दूर राहिले
स्पर्शावाचून उगिच उमटला काटा अंगावरी !
हरवले माझे काही तरी !
बघताबघता भुलले डोळे
त्या डोळ्यांतिल भाव
निराळे
जागेपणी मज भूल घातली बाई कोणीतरी !
हरवले माझे काही तरी !
लज्जा की ती होती भीती
अजुनी मज ते नसे माहिती
तिथुन परतले, परि विसरले तेथे काहितरी !
हरवले माझे काही तरी !
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.