गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
हरि तुझी कळली चतुराई
Hari Tuzi Kalali Chaturai
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
हरि, तुझी कळली चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही !
गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानीं या मला अडवुनी
दाविसी धिटाई !
गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडी काढता होउ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनि
काय रे
तर्हा ही !
मी न एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना
हिरवी वनराई !
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.