गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
ही कुणी छेडिली तार
He Kuni Chedali Taar
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम कुठुनी ये केदार !
तूच छेड ती, तूच ऐक ती
आर्त सुरावट तुझ्याच हाती
स्पर्षावाचुन तूच छेडिसी माझी हृदय-सतार !
जागृत मी का आहे स्वप्नी ?
श्रवणि पडे पण दिसे न नयनी
स्वप्नातच
का मजसि बोलले माझे राजकुमार ?
स्वप्नासम मज झाले जीवन
स्वप्नही नीरस सखी, तुझ्यावीण
अर्ध्या रात्री शोधीत आलो तुझे प्रियतमे, दार !
वेलीवर त्या नका, चढू नका
चढा सूर नच लवे गायका !
तूच चढविला तारस्वर हा तूच तोड ही तार !
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.