ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
हुकुमाची राणी माझी
राया, मी डाव जिंकला
लागला रंग तुम्हां, साधले डाव दोन
कैफात गुंग होता राहिले नाही भान
बायकी कावा माझा, राखून पत्ता ठेवला !
उतारी करा आता, चवर्या दुर्र्या टाका
आताच मारला ना बदामी माझा एक्का ?
कटाप रंग चारी, हुकूम हाती राहिला !
मघाचा डाव कसा ध्यानात नाही आला ?
हातात राणी माझ्या, गुलाम सर केला
उलटली बाजी आता, राणीनं राजा मारला !