गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
हे वदन तुझे की कमळ निळे
He Vadan Tuze Ki Kamal Nile
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
हे वदन तुझे की कमळ निळे ?
का नयन पाहता होति खुळे ?
विशाल झाले शांत सरोवर
नयनांपुढती अथांग सागर
शेषशायी तव रूप मनोहर
हलकेहलके वर उजळे !
कुठे सख्यांचा मेळा लपला
कोठे उपवन, कोठे मिथिला
श्रीविष्णू तू,
मी तर कमला
शतजन्म चुरीन मी पदकमले !
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.