गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • हेच ते ग तेच हे ते
 • Hech Te Ga Tech He Te
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  हेच ते ग तेच हे ते, स्वप्‍नी येती सारखे
  मूर्त केले स्वप्‍न तू हे चित्ररेखे लाडके

  हेच डोळे ते टपोरे, हीच कांती सावळी
  नासीकेखालील रेषा हीच काळी कोवळी
  हेच हसरे ओठ बाई मूक तरिही बोलके

  हीच छाती रुंद जेथे मीच माथे

  टेकिले
  लाजुनीया चूर झाले भीत डोळे झाकिले
  ओळखीली माळ मी ही, हीच मोती माणिके

  गूज करिती हे कधी ग धरुन माझी हनुवटी
  प्रश्‍न पुशिती धीट केव्हा मूठ पडते मनगटी
  ओठ ओले करुन जाती काय सांगू कौतुके ?


गदिमा गौरव | Special Quotes
 • लेखक पु.भा.भावे:
  वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems