गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
हेच ते चरण अनंताचे
Hech Te Chran Anantache
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
हेच ते, हेच ते, हेच ते
हेच ते चरण अनंताचे
ध्यान विषय हे ऋषीमुनींचे, संतमहंतांचे
सोनसळ्यांचा हा पीतांबर
वसन मनोहर पीत कटिवर
उदरभाग हा सुनील सुंदर
आजानु हे असेच दर्शन सपद्महातांचे
सुदीर्घ बाहू विशाल छाती
वैजयंति वर सदैव
रुळती
शंख कंठ वर हनु निमुळती
सुहस्य वदना म्हणू काय मी सदन अमृताचे
हीच नासिका हेच सुलोचन
चंद्रसूर्य ज्या नमिती लाजुन
हा श्री विष्णू त्रिभुवन जीवन
रूपच आले साकारुन मम मनोवांच्छितांचे