गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • होणार स्वयंवर तुझे जानकी
 • Honar Sawayamvar Tuze Janaki
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता
  जामात कोणता मिळेल न कळे ग ताता

  ही लतेसारखी धरणीमधुनी आली
  तो गगनामधुनी येईल का ग खाली ?
  देईल आलिंगन वेली मूर्त वसंता

  तुज पति पाहिजे ग श्यामल मेघांवाणी
  ही आवड माझी तुला कथियली

  ग कोणी
  डोळ्यांत तुझ्या ती दिसते येता-जाता

  तो तोच असावा ज्याची ऐकुन कीर्ति
  या मनी तयाची आकारुन ये मूर्ति
  लाजसी अशी का नाव तयाचे घेता

  ते नाव जाहले अधरावर या रंग
  त्या नामस्मरणे कंपित होते अंग
  मिटतात लोचने बधिरपणा ये चित्ता


गदिमा गौरव | Special Quotes
 • यशवंतराव चव्हाण
  गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems