ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
होशी काय निराश, असा तू, होशी काय निराश
पायतळाची अचला धरणी, अचल शिरी आकाश
मार्ग नियोजित, हेतु निर्मळ, आडवील तुज किती वावटळ
धूलिकणांतून आरपार बघ येतो सूर्यप्रकाश
कृतनिश्चयी तू पुरुष साहसी, अनुगामिनी मी तुझी प्रेयसी
मी न पाहिला कल्पनेतही माझा नाथ
हताश
उचल पुन्हा घे निशाण हाती, मीही येते तुझ्या संगती
तुझ्या हृदयी मी भरुन राहिले, व्यथेस ना अवकाश