गदिमा नवनित
  • एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,
    शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • श्रावण आला ग वनी श्रावण आला
  • Sharavan Aala Ga Vani Sharavan Aala
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    श्रावण आला ग वनी श्रावण आला
    दरवळे गंध मधूर ओला

    एकलीच मी उभी अंगणी
    उगीच कुणाला आणित स्मरणी
    चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला

    बरसू लागल्या रिमझिम धारा
    वारा फुलवी मोर पिसारा
    हलू लागली झाडेवेली नाच सुरू जाहला



    उरात नवख्या भरे शिर्शिरी
    शिरशिर करी नृत्य शरीरी
    सूर कुठून ये मल्हाराचा पदर कुणी धरिला

    समीप कुणी आले, झुकले
    किती धिटावा ओठ टेकले
    मृदुंग की ती वीज वाजते, भास तरी कसला


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems