गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • अपराध मीच केला
  • Aparadh Mich Kela
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी !
    जाणीव हीच माझ्या जिवा सदैव जाळी !

    जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा
    डोळ्यांतुनी हळू या हृदयात पाय ठेवा
    बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी !

    राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा
    भासात गुंतवावा

    मी जीव का कुणाचा ?
    अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली !

    गीतकार: ग.दि.माडगूळकर
    संगीत कार: सुधीर फडके
    गायक: मालती पांडे,सुधीर फडके
    चित्रपट : वंदे मातरम्‌


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems