गदिमा नवनित
  • विठ्ठलाचे पायी थरारली वीट, उठला हुंदका देहुच्या वार्‍यात,तुका समाधीत चाळवला.
    संत माळेतील मणी शेवटला,आज ओघळला एकाएकी....
मराठी युनिकोड फॉन्ट
अथर्वशीर्ष (संगीत:प्रभाकर जोग) | Atharvashirsha (Music:Prabhakar Jog)
  • पद्मश्री कै.गजानन दिगंबर माडगूळकर यांना गदिमा या लाडक्या नावाने मराठी रसिक ओळखतो.दोन हजारांहून अधिक चित्रपट गीते आणि दीडशेहून अधिक पटकथा इतकी प्रचंड साहित्य संपदा कमावणमर्‍या गदिमांना गीत रामायण लेखनाने आधुनिक वाल्मीकी हा सार्थ सन्मान मिळवून दिला.
    गीतरामायणाला धर्म ग्रंथाचे स्वरुप प्राप्त झाले.समाजात रुढ असलेल्या चैतन्यांचे त्यांनी अनन्यभावे स्तवन केले,या स्तवनांचा तितक्याच भक्तिभावाने सादर केलेला अविष्कार म्हणजेच चैतन्य गौरव !.



    महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गणपति अथर्वशीर्षाचे मराठी गीतांतर
    संगीत : प्रभाकर जोग
    गायक : आनंद माडगूळकर,वैजयंती लिमये
  • Box-C-9
  • पाने: 1


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.