गदिमा नवनित
  • इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता
    बोरीबाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार !
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)
  • पं.महादेवशास्त्री जोशी:
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार ! गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.

    सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.
  • Box-C-20
  • पाने: 1


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.