गदिमांच्या लोकप्रिय गाण्यांना नव्या जनरेशनच्या ढिनच्याक गाण्यांच्या रुपात आणण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न,जून्या गाण्यांच्या चालींशी कुठलिही तुलना न करता एक वेगळा प्रयोग म्हणून नव्या जनरेशनला नक्कीच आवडेल. गदिमांचे मित्र व चित्रपट निर्माते गोविंदराव घाणेकर यांचे सुपुत्र नंदू घाणेकर यांनी हा वेगळा प्रयोग केला आहे,संगीत नंदू घाणेकरांचे आहे तर या गाण्यांचे संगीत संयोजन केले आहे आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतूल यांनी,गायक आहेत रविंद्र साठे,योगिता गोडबोले,अजय गोगावले.
अगदि आज च्या ध्वनिमुद्रण प्रसंगी योगिता गोडबोले,अवधूत वाडकर,अजय गोगावले,नंदू घाणेकर,अशोक पत्की,अतूल गोगावले
दिली कोंबड्याने बांग
विझे चांदण्याची रांग
ये जाग पाखरांना, तो ऐक किलबिलाट
झाली भली पहाट !
रे ऊठ रानराजा झाली भली पहाट
मुक्या लेकराची माय
हंबरते माझी गाय
घे ओढ वासरू ते रुतली गळ्यात गाठ
उरी लेकराची आस
झरे माउलीची कास
त्या झेलताच धारा आला भरून माठ
लागे दुडुदुडु करू
खुळे शेळीचे कोकरू
येताच माय चाटु ते थांबले मुकाट
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल
गवतात झोपलेली न्हाली दंवात वाट !
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..